मला मिळालीय साथ सोबत ख-या अर्थाने
मला सुखावणारी माझ मन ओळखणारी
माझ्या मनात डोकावणारी मला समजुन घेणारी
माझ्या सुखात सुखावणारी माझ्या दु:खाला फुंकर घालणारी
अशी साथ जिच्या chayet मी निर्वेधपणे विसावु शकते
जिच्या सुरात आनंदाने न्हाउsशकते
जिच्या तालावर मी नाचु शकते
जिच्या रंगात मी रंगुन जाते
हिरव्या हिरव्या लाम्बवर पसरलेल्या कुरणासारखी साथ
जिथे चालताना धाप लागत नाही
उसळलेल्या समुद्राच्या लाटांसारखी
अंगावर आली तरी सुखावणारी साथ
मिळालीय मला
काटे बाजुला सारुन गुलाबाच्या फुलानी
माझी ओंजळ भरणारी
जाइ जुइच्या सुगंधानी भरलेली साथ
मिळालीय मला
मझ्या आयुष्यात चांदण फुलवणारी
सुखाच्या पावसात चिम्ब भिजवणारी
चहाचे घोट घेत शिळोप्याच्या गप्पा मारणारी
भुतकाळाच्या आठवणीत रमणारी
भविष्य काळातील सुखस्वप्न दाखवणारी
साथ मिळालीय मला
कानात कुजबुजणारी ओठावरच हसु
हळुच टिपणारी
माझ्या डोळ्यात माझी सुखदु:ख बघणारी
स्पर्शातुन आश्वासक साथ देणारी
साथ मिळालीय मला
ख-या अर्थाने साथ सोबत मिळालीय मला .
मला सुखावणारी माझ मन ओळखणारी
माझ्या मनात डोकावणारी मला समजुन घेणारी
माझ्या सुखात सुखावणारी माझ्या दु:खाला फुंकर घालणारी
अशी साथ जिच्या chayet मी निर्वेधपणे विसावु शकते
जिच्या सुरात आनंदाने न्हाउsशकते
जिच्या तालावर मी नाचु शकते
जिच्या रंगात मी रंगुन जाते
हिरव्या हिरव्या लाम्बवर पसरलेल्या कुरणासारखी साथ
जिथे चालताना धाप लागत नाही
उसळलेल्या समुद्राच्या लाटांसारखी
अंगावर आली तरी सुखावणारी साथ
मिळालीय मला
काटे बाजुला सारुन गुलाबाच्या फुलानी
माझी ओंजळ भरणारी
जाइ जुइच्या सुगंधानी भरलेली साथ
मिळालीय मला
मझ्या आयुष्यात चांदण फुलवणारी
सुखाच्या पावसात चिम्ब भिजवणारी
चहाचे घोट घेत शिळोप्याच्या गप्पा मारणारी
भुतकाळाच्या आठवणीत रमणारी
भविष्य काळातील सुखस्वप्न दाखवणारी
साथ मिळालीय मला
कानात कुजबुजणारी ओठावरच हसु
हळुच टिपणारी
माझ्या डोळ्यात माझी सुखदु:ख बघणारी
स्पर्शातुन आश्वासक साथ देणारी
साथ मिळालीय मला
ख-या अर्थाने साथ सोबत मिळालीय मला .
No comments:
Post a Comment