Saturday, April 2, 2016

saath

मला मिळालीय साथ-सोबत ख-या अर्थाने
मला सुखावणारी , माझ मन ओळखणारी
माझ्या मनात डोकावणारी , मला समजुन घेणारी
माझ्या सुखात सुखावणारी , माझ्या दु:खाला
फुंकर घालणारी
अशी साथ जिच्या छायेत मी निर्वेध्पणे
विसावु शकते
जिच्या सुरात आनंदाने न्हाउ शकते
जिच्या तालावर मी नाचु शकते
जिच्या रंगात मी रंगुन जाते
हिरव्या हिरव्या लाम्बवर पसरलेल्या
कुरणासारखी साथ
जिथे चालताना धाप लागत नाही
उसळ्लेल्या समुद्राच्या लाटांसारखी
अंगावर आली तरी सुखावणारी साथ
मिळालीय मला
काटे बाजुला सारुन गुलाबाच्या फुलानी
माझी ओंजळ भरणारी
जाइजुइच्या सुगंधानी भरलेली साथ
मिळालीय मला
माझ्या आयुष्यात चांदण फुलवणारी
सुखाच्या पावसात चिम्ब भिजवणारी
चहाचे घोट घेत शिळोप्याच्या गप्पा  मारणारी
भुतकाळाच्या आठवणीत रमणारी
भविष्य काळातील सुखस्वप्न दाखवणारी
साथ मिळालीय मला
कानात कुजबुजणारी , ओठावरच हसु हळुच टिपणारी
माझ्या डोळ्यात माझी सुखदु:ख बघणारी
स्पर्षातुन आश्वासक साथ देणारी
साथ मिळालीय मला
ख-या अर्थाने साथ-सोभत मिळालीय मला .