Thursday, July 23, 2015

नियती

आयुष्य कसे ,कुणी जगावे
हे नियतीने ठरवावे
कधी राग कुणाचे
कधी बोल कुणाचे झेलत रहावे

घ्यावे जे दिले नियतीने
स्वस्थ बसुनि घेत रहावे
बोल लावलावोनि नियतीला
आयुष्य आपुले पोळत रहावे

घडते जे आपुल्या हाती
आपुले ते कर्म नसावे
दोषी नसते कर्म आपुले
गतजन्मीचे भोग असावे

घडता घडता घडते काही
त्यास काळाचा महिमा म्हणावे
सुटतो सा-या  कर्मामधूनि     म्हणता,
नियतीचे सारे खेळ असावे