Thursday, July 23, 2015

नियती

आयुष्य कसे ,कुणी जगावे
हे नियतीने ठरवावे
कधी राग कुणाचे
कधी बोल कुणाचे झेलत रहावे

घ्यावे जे दिले नियतीने
स्वस्थ बसुनि घेत रहावे
बोल लावलावोनि नियतीला
आयुष्य आपुले पोळत रहावे

घडते जे आपुल्या हाती
आपुले ते कर्म नसावे
दोषी नसते कर्म आपुले
गतजन्मीचे भोग असावे

घडता घडता घडते काही
त्यास काळाचा महिमा म्हणावे
सुटतो सा-या  कर्मामधूनि     म्हणता,
नियतीचे सारे खेळ असावे



Tuesday, June 23, 2015

साद

सांगू कशी वेदना मनाची
स्पर्श झाला मुका
हृदय आक्रंदतय पण
शब्दाना पायच फुटत नाहीत
डोळ्यातील आर्जव
पोहचत नाही तुझ्यापर्यंत
मुकपणे पाझरतय हृदय
आतल्या आत
कारण   डोळ्यानी
अडवलीय वाट अश्रूंची
हिंदकळतेय भावनांच्या हिंदोळ्यावर
नाव आयुष्याची
होशील माझा किनारा?